PUNE CKP FAMILY PUBLIC TRUST

सीकेपी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या कार्याची ओळख समाजाला आणि भावी पिढीला व्हावी आणि समाजाबाहेरील तसेच अमराठी भाषिक समाजालाही व्हावी या उद्देशाने “चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज – एक गौरवयात्रा” अर्थात “The Pride of Chandraseniya Kayastha Prabhu Community”. हा ग्रंथ मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत प्रकाशित होत आहे.
“चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज – एक गौरवयात्रा”
“The Pride of Chandraseniya Kayastha Prabhu Community”
या ग्रंथाची डिजिटल आवृत्ती येथे वाचा….
Areas of Work
ABOUT PUNE CKP FAMILY PUBLIC TRUST
“Pune”, a city synonymous with its rich “Cultural, Historical and Educational” heritage….
Here lives a talented and forward thinking Kayastha community, which has been in the forefront in fields like Education, Art, Literature, Music, Culinary, Science and Industry. And at the same time, it has maintained its own traditional identity.
With a mission of bringing together the brethren from this “Proud & Fiery” community, few like-minded visionaries formed the “Pune CKP Family” in June 2016.
“Family”, the word itself is all encompassing with Love, Care, Togetherness & Respect for one and all.
It was quite heartening to see the response from the community, as our vision started spreading its wings. Slowly, the family started taking on new challenges and more helpful souls associated with it.
The Vision and Mission Statement included, but was not limited to, “Financial Aid to members for Medical & Educational Purpose and Appreciation & Encouragement to students for their Academic Excellence”.
In addition to “Monthly Meetings”, Cultural Events like celebration of Anniversaries & Birthdays, Sightseeing Tours, getting together on religious occasions like Holi, Ganeshotsav Maha-Aarti, Navaratri, Kojagiri, Diwali, Kumkumarchan & Haldi-Kumkum for ladies and National Festivities on Independence Day & Republic Day, helped to strengthen the essential bonding amongst the family members.
After the successful organization of these event, the family was supercharged with enthusiasm to undertake social causes such as, Financial Aid to “Old Age Homes”, “Institutes assisting Children with Special Needs”, “Economically backward Students”, “Tribal Communities”, “Armed Forces Family Welfare Units”, Medical Aid to Poor & Needy. To channelize this thought process and to proceed in a systematic manner, all necessary documentation was completed and “PUNE CKP FAMILY PUBLIC TRUST” was born on 14 May 2018.
Donations & Contributions
Following are the Donations & Contributions made under Pune Ckp Family Trust for various important causes.
To know more about our contributions please click on the Button given below
0 Educational Support
0 Healthcare Initiatives
0 Social Welfare & Community Development
0 Environmental Programs
पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट संस्थेतर्फे शिक्षण, आरोग्य व समाजकल्याण क्षेत्रातील आमचे उपक्रम
पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्ट, पुणे ही संस्था सन २०१८ मध्ये स्थापन झाली असून गेली ८ वर्षे सातत्याने समाजसेवेच्या कार्यात सक्रिय आहे. ट्रस्टची नोंदणी E-8167 / पुणे / दि. १४.०५.२०१९ या क्रमांकाने झाली असून संस्था ८० जी अंतर्गत नोंदणीकृत आहे. “समाज हिताय, सर्वजन सुखाय” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन ट्रस्ट विविध सामाजिक व सी.एस.आर. उपक्रम राबवत आहे.
आजपर्यंत ट्रस्टमार्फत अंदाजे ₹ ६४ लाखांहून अधिक रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण तसेच दिव्यांग व विशेष गरजा असलेल्या मुलांचे शिक्षण ही ट्रस्टची प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. समाजातील गरजू घटकांपर्यंत थेट मदत पोहोचवणे हा ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे.
ट्रस्टच्या प्रमुख प्रकल्पांमध्ये प्रकल्प दिया अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुनर्वापर केलेल्या सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्ञानकिरण विद्यार्थी सहाय्य योजना या माध्यमातून गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. निरामय आरोग्य योजना अंतर्गत गरजू कुटुंबांना वैद्यकीय सहाय्य व आरोग्य सेवा पुरवण्यात येतात. तसेच प्रकल्प उडाण अंतर्गत मूकबधिर मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. ग्रामीण भागातील मुलींसाठी ब्लॉसमिंग बड्स या प्रकल्पाद्वारे मासिक पाळीच्या काळात आवश्यक सॅनिटरी नॅपकिन सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
भविष्यात ट्रस्टकडून आणखी व्यापक स्वरूपाचे सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असून, आगामी सी.एस.आर. प्रकल्पांमध्ये ग्रामीण भागात सौरऊर्जेवर चालणारा पाणी शुद्धीकरण प्रकल्प, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सहाय्य योजना तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळांचे सौरऊर्जीकरण यांचा समावेश आहे. या आगामी प्रकल्पांसाठी अंदाजे ₹ ४० लाखांहून अधिक निधी खर्च करण्याचे नियोजन आहे.
सन २०२६–२७ या कालावधीत ट्रस्टचे एकूण सामाजिक योगदान ₹ १ कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचवून शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवणे हेच पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्टचे दीर्घकालीन ध्येय आहे.

Testimonials
Special Thanks
We Sincerely Thank All our Pune CKP Public Trust Members & Supporter's for their constant support





