पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट – एक वाटचाल

“समाजाचे देणं समाजालाच द्यावं” या विचारानेच एका समूहाची स्थापना होते आणि पुढे याच सामाजिक बांधिलकीतुन “पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट” ची स्थापना होते…

यातूनच सीकेपी समाजातील अनेक कर्तृत्ववान, गुणसंपन्न हिरे शोधून त्यांच्या गुणांचा, कार्याचा गौरव करण्याची संकल्पना पुढे आली …  ही व्यक्तिमत्त्व अशी आहेत की जाती पातीच्या पुढे जाऊन त्यांनी संपूर्ण समाजहितासाठी, देशहितासाठी कार्य केले आहे …!!

“पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट” देखील समाजकार्याची धुरा गेली काही वर्षे अविरत यशस्वीपणे वहात आहे…

“पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट” ची सुरुवात एका छोट्याश्या “पुणे सीकेपी फॅमिली” या व्हाॅट्सॲप समूहाच्या स्थापनेतून झाली … ११ जानेवारी २०१६ रोजी स्थापन झालेल्या या समूहाने समूहातील आदरणीय सदस्य सर्वश्रुत मा. श्री. सुधीर वैद्य यांचा गौरव “शिरोमणी” या पुरस्काराने करावयाचे ठरवले. १८ मार्च २०१८ रोजी हा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. श्री सुधीर वैद्य यांच्या बरोबरच कला, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणा~या इतर १० व्यक्तींचा सन्मान केला होता … 

याच सोहळ्यात सामाजिक बांधिलकी म्हणून रुपये पंचवीस हजार फक्त एका गरजवंत सीकेपी कुटूंबाला देण्यात आले … तसेच मा. श्री. सुधीर वैद्यजी यांची शालेय वह्यांनी तुला करून, त्या ६५किलो वह्या नूतन समर्थ विद्यालय या रेड लाईट एरियातील मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेला दान केल्या. याच पुरस्कार सोहळ्यात 400 च्या वर ज्ञातीबांधवांनी एकत्र येऊन समाजाचे ऐक्य दाखवले …!

इथून पुढे … “पुढचे पाऊल पुढेच टाका” या भावनेने … वाटेत येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करत १४ मे २०१८ रोजी “पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट” ची स्थापना झाली.  २१ मे २०१८ रोजी म्हणजे ट्रस्टच्या स्थापने नंतर बरोबर एक आठवड्याने विरार स्थित एका हृदयविकाराने त्रस्त सीकेपी व्यक्तीला तातडीची मदत म्हणून रु. ११ हजार फक्त देण्यात आले.

१ जुलै २०१८ रोजी सह्याद्री मानव सेवा मंच ह्या पंढरपूरच्या  वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्प घेऊन, वारकरी सेवेचे व्रत घेतलेल्या सेवाभावी संस्थेला, पुणे  सीकेपी पब्लिक ट्रस्ट च्या सभासदांनी स्वयंसेवकांचे काम करून मदत केली … त्या संस्थेच्या कार्याचा आवाका बघून नुसती स्वयंसेवक म्हणून मदतीखेरीज, आत्तापर्यंत पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट ने सह्याद्री मानव सेवा मंचला एकूण ३.६१ लाखाची मदत मिळवून दिली आहे. यासाठी वेळोवेळी मदत केलेल्या सर्व दानशूरांची पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट मनःपूर्वक आभारी आहे.

२६ जानेवारी २०१९ रोजी पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्टचा दुसरा गौरव सोहळा टिळक स्मारक नाट्यगृहात राष्ट्रप्रेमाच्या भावनेत संपन्न झाला . 

६५० सीकेपी प्रेक्षकांसमोर, त्यावेळी देशासाठी लढलेल्या वीरांना आणि विरपत्नींना पुरस्कृत करण्यात आले. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांचा गुणगौरव करण्यात आला … याच कार्यक्रमात सह्याद्री मानवसेवा मंच सहित, क्वीन्स मेरी’ज टेक्निकल इन्स्टिट्यूट, दादर सीकेपी एज्युकेशन संस्था या तीन संस्थांना प्रत्येकी रु. १.५० लाखाची मदत करण्यात आली. तसेच आनंदवन भूजल शाश्वत सहयोग या संस्थेला रु ५० हजारांची मदत करण्यात आली …

ऑगस्ट २०१९ मध्ये सांगली/ कोल्हापूर येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना ABCKPMS या संस्थेशी संलग्न होऊन, पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट ने  १९ ऑगस्ट २०१९ रोजी ५० डझन वह्यांचे वाटप केले .

त्यावर्षीची दिवाळी संध्याकाळ धायरी येथील आई वृद्धाश्रमात तेथील मंडळी बरोबर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून, आनंदाची देवाण घेवाण करत व्यतीत केली.

मे २०१९ रोजी समूहाच्या एका सभासदाला वैद्यकिय तातडीची मदत म्हणून रु. २५००० फक्त, बिनव्याजी कर्जरूपी देण्यात आले … सभासदाने नंतर हप्त्यांमध्ये वेळेत फेडले देखील..! यामध्ये संस्था पाहिले दोन महिने कुठलेही हप्ते घेत नाही. त्यानंतर पुढील दहा महिन्यात एकूण रकमेच्या१०% रक्कम हप्त्यांमध्ये परत करायची असते. अशाप्रकारे तातडीची वैद्यकीय मदत करून पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट नेहमीच सगळ्यांच्या सोबत आहे.

सालाबादप्रमाणे २०२० चा गौरव सोहळा २८ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु कोरोना वैश्विक महामारीमुळे हा सोहळा रद्द करण्यात आला … परंतु समाजसेवेचे अखंड व्रत घेतलेल्या पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्टने आधी ठरवल्याप्रमाणे १४ मे रोजी  कुठलाही समारंभ न करता सामाजिक आरोग्याचे भान ठेवून … 

ठाणे स्थित सह्याद्री मानव सेवा मंच याना रु.१.५० लाख(आधी लिहिल्या प्रमाणे गेली ३७ वर्षे वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणारी संस्था)

पुणे स्थित सेवा सहयोग फौंडेशन यांना रु. १.५० लाख (गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणारी संस्था)

मुंबई स्थित अद्वित्य कला संगम ट्रस्ट यांना रु. १.५० लाख (गतिमंद प्रौढांना सहाय्य करणारी संस्था) 

तसेच स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था, पुणे यांना  ५० डझन २०० पानी वह्यांचे वाटप करण्यात आले.

याशिवाय कोरोनाच्या लॉकडाऊन काळात समाजातील १०० गरीब गरजूं कुटुंबियांना महिन्याचे किराणा सामान देणे … तसेच पुणे शहरातील विविध पोलीस चौकीतल्या दिड हजार पोलिसांना सॅनिटाइझर, हँडग्लव्हस, फेसमास्क याची मदत केली.आई वृद्धाश्रम पुणे, निवारा वृद्धाश्रम पुणे आणि SAMPARC (लोणावळा) या संस्थांच्या ठिकाणी खाद्यतेल आणि वाणसामानाची मदत केली, लॉकडॉऊन च्या कठीण काळात वझे गुरुजींच्या गोशाळेला चाऱ्या करीता रु १०,०००  ची रोख रक्कम दिली करोनाच्या काळात पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्टचे झुंझार कार्यकर्ते सतत झटत होते. गेल्या ४ वर्षात अंदाजे रु. १२,१८,०००/- ची मदत ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे

अशा रीतीने अखंड सेवाभाव मनात ठेवून कार्य करणारी ही सीकेपी संस्था, आता सभासदत्वाचे सर्व सीकेपी मंडळींना आवाहन करीत आहे …

त्यासाठी खालील प्रमाणे सभासदत्व आपणाला मिळू शकते …

१) सिल्वर सभासदत्व

@रु. ५००/- प्रतिवर्षी प्रतिसभासद

२) गोल्ड सभासदत्व

@२२५०/- पंचवार्षिक सभासदत्व प्रतिसभासद

३) प्लॅटिनम सभासदत्व

@५०००/- आजीवन सभासदत्व प्रतिसभासद.

वरील सर्व सभासद फी मध्ये सभासदत्वा खेरीज मासिक मिटिंगचा खर्चही धरण्यात आला आहे.

सभासदत्व घेण्यासंबंधीत अधिक माहितीसाठी श्री निलेश गुप्ते (8669151533) यांच्याशी बोलून करावे .

अशी ही पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट … समाजासाठी कार्य करणारी, सर्व सणसमारंभ एकोप्याने आनंदाने साजरे करणारी, खास सीकेप्यांची आपली आपुलकीची संस्था…!!

पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट करीता,

श्री नंदकुमार वढावकर

अध्यक्ष