पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट व्हिजन २०२१

बंधू भगिनींनो,

संपूर्ण जग हे कोरोनाच्या आपत्तीचा सामना करून त्यातून सावरत आहे. त्यातून पुन्हा उभारी घेऊन “पुनः श्च हरिओम” म्हणत कार्य सुरु झाले आहे. पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्टने २०२० च्या कठीण काळातही आपले सामाजिक कार्य चालू ठेवले होतेच. गेल्या चार वर्षांचे कार्य पाहता समाजाशी विश्वासाचे नवे पूल बांधले आहेत. हा विश्वासच चालू २०२१ वर्षात विविध कार्य करण्याची प्रेरणा, उभारी, उत्साह, जोश देत आहे. त्या आधारावरच व्हिजन २०२१ ची काही उद्दिष्टे आपण समोर ठेवीत आहोत.

व्हिजन २०२१ – उद्दिष्टे

शैक्षणिक – सध्या मूलभूत गरज आहे ती विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याची. त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण असणे जरुरी आहे. तळागाळातील आणि गरीब विद्यार्थीसुद्धा आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत असे वाटते. शाळांमध्ये अभ्यासासाठी संगणक शिक्षण आवश्यक झाले आहे. आजच्या युगात संगणक ही काळाची गरज असल्याने पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट कडून ज्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा शाळांना संगणक देणगी स्वरुपात देत आहोत. आत्तापर्यंत, आदिवासी क्षेत्रातील शाळांना १५ संगणक, १ लॅपटॉप देणगी स्वरूपात देण्यात आले आहेत. पुढेही अजून काही शाळांना अशी मदत करण्याचे योजले आहे. तसेच वेळोवेळी गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्यांची वाटप करण्यात येणार आहे.

गरजू मुलांना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. गरजू मुलांच्या शिक्षणासाठी दत्तक योजना ट्रस्ट नेहेमीच तयार असतो व या वर्षी सुद्धा ही योजना अमलात आणणार आहे.

पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट प्रोत्साहन पुरस्कार याचे आयोजन करत आहे. पुणे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील हुशार आणि होतकरू १०वी व १२वीत  उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना (प्रत्येकी ५) पुरस्कार देण्यात येतील.

हा सर्व उपक्रम “ज्ञानकिरण – विद्यार्थी सहाय्य योजना” या नावाने राबवण्यात येणार आहे.

सामाजिक कार्य – आत्तापर्यंत विविध क्षेत्रांत सामाजिक कार्यात ट्रस्ट ने पुढाकार घेऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू लोकांना अनेक प्रकारे मदतीचा हात दिला आहे. कोरोना काळातही आमचे योद्धे कोरोनाशी लढत गरजूंपर्यंत विविध प्रकारे मदत पोहोचवत होते. २०२१ ह्या वर्षात ही सामाजिक कार्याची परंपरा चालू ठेवणार आहोत. कधी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागलाच तर ट्रस्ट सदैव पुढे असेलच.

ट्रस्टचे ब्रिदवाक्य “समाज हिताय सर्वजन सुखाय” आहे. त्यानुसार व्यक्तिगत गरजांबरोबरच आवशक्यतेनुसार  सामाजिक संस्थांना आर्थिक व वस्तुरूपात मदत करण्यात येईल.

पर्यावरण – ‘निसर्ग’ ही ईश्वराने निर्माण केलेली अद्भुत गोष्ट आहे. पण या निसर्गाचा समतोल राखणे महत्वाचे आहे. नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल झाले आहेत. पर्यावरणाची समस्या वाढत आहे. त्यासाठी ट्रस्टने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन अशी कार्ये हाती घेतली आहेत. “पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा” या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन हे उद्दिष्ट ट्रस्टने ठेवले आहे.

क्रीडा – कार्यक्षम जीवनासाठी संपन्न आरोग्य महत्वाचे आहे. त्यासाठी खेळांना खूप महत्व आहे. त्यामुळे शारीरिक, बौद्धिक क्षमता वाढण्या बरोबरच आरोग्यही सुधारते. तसेच मन उत्साही राहते. हा विचार करून ट्रस्ट, काही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, बॉक्स फुटबॉल, कॅरम, टेबले टेनिस अशा विविध स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करणार आहे. ज्यामुळे ज्ञातीतील युवांना प्रोत्साहन मिळेल व क्रीडा क्षेत्रात नवी पिढी पुढे येईल.

वैद्यकीय – समाजातील वैद्यकीय सेवा सुविधांची गरज लक्षात घेऊन ट्रस्टने आजवर अनेक वैद्यकीय सेवा पुरवल्या आहेत. तसेच अनेक मेडिकल कॅम्प मध्ये सक्रिय सहभाग घेऊन मोलाचे योगदान दिले आहे.

आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला अनेक भक्त पायी वारी करत असतात. या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्थेला जोडून ट्रस्टचे कार्यकर्ते या वैद्यकीय सेवेत योगदान देतात. आदिवासी पाडे , ग्रामीण विभागातील शाळा या वस्त्यांमध्ये जाऊन वैद्यकीय सेवेत सहभागी होतात. २०२१ सालातही अशा सेवेत खंड पडणार नाही.

साहित्य व कलाक्षेत्र – साहित्य हा आपल्या जीवनातील प्रतिबिंबाचा आरसा आहे. साहित्याला सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची परिमाणे प्राप्त झाली आहेत, ज्यामुळे साहित्याचे क्षेत्र विस्तारले आहे. या विस्तारित क्षेत्राचा विचार करून ज्ञातीतील साहित्यिकांसाठी कविता, कथा, निबंध अशा साहित्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी ह्या क्षेत्रातले दिग्गज व तज्ञ परीक्षकांतर्फे परीक्षण करून योग्य निकाल ठरवले जातील.

ज्ञातीतील अनेक बंधू भगिनी वेगवेगळ्या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्यास ह्या उपक्रमाद्वारे संधी उपलब्ध होईल. २०२० साली जी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, तिला महाराष्ट्रातूनच नव्हे तर, इतर राज्यातूनही उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

संगीत क्षेत्रातील प्रतिभावंत कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना प्रकाशात आणण्यासाठी सीकेपी संगीत रजनी द्वारे गायन व वादन सादरीकरणाची एक संधी प्राप्त करून देण्यात येणार आहे.

मराठी संस्कृती मधील सण, उत्सवांची परंपरा आपण अभिमानाने जपत असतो. हे उत्सव साजरे करण्यात जो उत्साह असतो, तो वृद्धिंगत करण्यासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा, तसेच दिवाळीत रांगोळी, किल्ले स्पर्धा यांचे आयोजन होणार आहे.

Pune CKP Public Trust Vision 2021

Dear Brothers and Sisters,

The whole world is recovering from the Corona disaster. The work has started by re-emerging from it and saying “Lets Restart”. Pune CKP Public Trust had continued its social work even during the difficult times of 2020. Looking at the work of the last four years, new bridges of trust have been built within the society. It is this belief that is inspiring, uplifting and motivating to do various things in the current year 2021. On that basis, we are putting forward some of the objectives of Vision 2021.

Vision 2021 – Objectives

Academics – The basic need right now is to provide a good education to the students. For this, all students need to have technological education. Even the poorest students should not be deprived of modern education. Computer education has become essential for study in schools. Since computers are the need of the hour in today’s age, we are donating computers from Pune CKP Public Trust to the schools where such students are studying. So far, 15 computers and 1 laptop have been donated to schools in tribal areas. There are plans to help some more schools in the future. Books & notebooks will also be distributed to needy school children from time to time.

Bicycles will be distributed to needy children. The Student Adoption Scheme is ready for the education of needy children and this scheme will be implemented again this year.

Pune CKP Public Trust Encouragement Award is being organized by the trust. Prizes will be given to the brightest and budding from 10th and 12th standard to best performing students (5 each) from economically weaker sections of the society in Pune district.

All these activities will be implemented under the name “Dnyankiran – Vidyarthi Sahayy Yojana”.

Social work – The Trust has so far taken the lead in social work in various fields. Maintaining the social commitment, Trust has given a helping hand to the needy in many ways. Even during the Corona period, our warriors were fighting the Corona and helping the needy in various ways. We will continue with this tradition of social work in the year 2021. Whenever there is a natural disaster, the trust will always be there.

The motto of the trust is “Samaj Hitaya Sarvajan Sukhaya”. Accordingly, financial and material assistance will be provided to individuals & social organizations as per the need.

Environment – ‘Nature’ is a wonderful thing created by God. But it is important to have balance in this nature. Many changes have taken place in the natural environment. The environmental problem is growing. For this, the trust has undertaken such activities as tree planting and tree conservation. The Trust aims to conserve the environment as per the motto “Save the environment, save lives, save the country”.

Sports – Good health is important for a functional life. And sports are very important for that. Along with increasing physical and intellectual capacity, sports also improves health. It also keeps the mind energized. With this in mind, the trust will organize some sports competitions. It will organize various competitions like cricket, badminton, box football, carom, table tennis every year. Trust will promote and encourage the youth to partake, so that a new generation will come forward in the field of sports.

Medical – Considering the need for medical services in the community, the trust has provided many medical services to date. Trust has also made valuable contributions by taking an active part in many medical camps.

Many devotees visit Pandharpur on foot for Ashadi and Kartiki Wari. Trust volunteers contribute to this medical service by joining an organization that provides medical services for these Warakaris. Volunteers of trust visit tribal enclaves, schools in rural areas and participate in medical services. Even in the year 2021, such service will not be interrupted.

Literature and Art – Literature is a mirror of our life. Literature has set benchmarks of our social and cultural life, which in turn has expanded the field of literature. Literary competitions such as poems, stories, essays will be organized for the writers from within the caste considering this extended area. For this, the correct results will be decided after examination by veterans and expert examiners in this field.

Many of our brethren are active in various fields of art. This initiative will give them an opportunity to progress in their field. The Rangoli competition which was organized in the year 2020 was well responded not only from within Maharashtra but also from other states too.

CKP Sangeet Rajni will provide a platform to promote and bring out the talented artists in the field of music, be it singing or playing various instruments.

We proudly cherish the tradition of festivals in Marathi culture. In order to increase the enthusiasm for celebrating such festivals, Decoration competition during Gauri Ganpati, as well as Rangoli, fort competition during Diwali will be organized.

Upcoming Events

Read more about our Upcoming events and be informed