१५० वर्षाहून हि जुने चं. का. प्रभू समाजाचे प्रभू राम मंदिर , महाड

महाड येथील प्रभुराम मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी
सलाबाद प्रमाणे याही वर्षी CKP समाज महाड यांनी आपल्या समाजाचे असलेल्या प्रभुराम मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पार पाडला, महाडमध्ये आलेल्या महापूराच्या जखमा ओल्या असतानाही कार्यक्रमाला समाजातील सर्वांनीच उपस्थिती लावली. रात्री आठ वाजता सुरू झालेला हा सोहळा एक वाजता समाप्त झाला.
नेहमी प्रमाणे लहान मुलांसाठी चॉकलेट हंडीच्या उत्साहात लहान मुलांचा आनंद ओसंडून वहात होता. तर नेहमी प्रमाणे पारंपारिक ckp खासियच्या भोजच्या पंगती बसल्या.
महापूराने मंदिराच्या झालेल्या नुकसानी बाबत चर्चा करण्यांत आली व मंदिराच्या जिर्णोद्धाराबाबत निर्णय घेण्यात आला. व तयारीला लागायचेच असा ठाम निर्धार करण्यात आला. या वेळी शंभराहून अधिक लोकांनी आपली उपस्थिती लावली. पूजा व आरती झाल्यानंतर पुणे CKP पब्लिक ट्रस्ट, पुणे यांच्याकडून समस्त ज्ञाती बांधवांकरीता पाठवलेल्या ब्लँकेट्स व चादरी इतर साहित्याचे वाटप करण्यांत आले. शेवटी सुंठवडा प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
रघुवीर देशमुख (अध्यक्ष CKP महाड)

Shrikrishna Janmashtami Celebration
« of 3 »
Mahad Ram Mandir 01
« of 5 »

About Prabhu Ram Mandir, Mahad

Read more about our latest news posts and be informed
  • All
  • Mahad Ram Mandir

महाड प्रभुराम मंदिराला महाप्रलयाचा तडाखा

महाड सीकेपी समाजाचे वैभव असलेल्या प्रभुराम मंदिराला महाप्रलयाचा तडाखा. वेळीच लक्ष न दिल्यास मंदिर इतिहासजमा होण्याची भीती. महाडमध्ये आलेल्या महाकाय पुराने महाड सीकेपी समाजाचे पुरातन ऐतिहासिक प्रभुराम […]

महाड येथील प्रभुराम मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

सलाबाद प्रमाणे याही वर्षी CKP समाज महाड यांनी आपल्या समाजाचे असलेल्या प्रभुराम मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पार पाडला, महाडमध्ये आलेल्या महापूराच्या जखमा ओल्या असतानाही कार्यक्रमाला […]

पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट संस्थेतर्फे महाड ला मदत

नमस्कार, काल, दिनांक २८ ऑगस्ट २०२१, पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट संस्थेतर्फे महाड ला जाउन आपल्या ज्ञातीतील कुटुंबियांना भेटून पुराचा प्रथक्ष आढावा घेण्यात आला व आपल्या ज्ञातीतील ५५ […]