पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट संस्थेतर्फे महाड ला मदत

नमस्कार,
काल, दिनांक २८ ऑगस्ट २०२१, पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट संस्थेतर्फे महाड ला जाउन आपल्या ज्ञातीतील कुटुंबियांना भेटून पुराचा प्रथक्ष आढावा घेण्यात आला व आपल्या ज्ञातीतील ५५ कुटुंबियांना ११० एक्स्पोर्ट quality ची ब्लॅंकेट्स एक अल्पमदत स्वरूपात करण्यात आली,

महाड येथील आपल्या ज्ञातीला अभिमानास्पद असे १५० वर्षा पेक्षा जुने ज्याचे अध्यक्ष कै. श्री सुरभानाना टिपणीस,(ज्ञाति भूषण)होते आशा प्रभू राम मंदिरास भेट देण्यात आली. आपल्या ज्ञातीला अभिमानास्पद असलेले प्रभू राम मंदिर, त्याचा इतिहास, मंदिराला लागून वहात असलेल्या सावित्री नदीच्या पुरामधील पाण्याच्या महाकाय प्रलयात १५० वर्षे जुन्या मंदिराचे झालेले नुकसान, मंदिराचा नुकसान झालेला ढाचा, गाभारा व संपूर्ण मंदिराचा परिसर याच्या नुकसानिचा आढावा घेण्यात आला, मंदिराच्या जीर्णोद्धार कसा करू शकतो यावर काही स्वरूपात चर्चा करण्यात आली व लगेचच जीर्णोद्धार करण्याचा श्री गणेश करण्याच्या निर्धाराने समस्त ज्ञाती तर्फे आरंभ म्हणून काल पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट तर्फे मंदिरा च्या जीर्णोद्धार साठी प्रथम ५१,०००/- मदत देण्यात आली,

या प्रसंगी महाड ज्ञातीतील चा.का.प्रभू. समाज मंडळीतील अध्यक्ष श्री टिपणीस, श्री रघुवीर देशमुख, सौ टिपणीस काका , सौ. देशपांडे,श्री चित्रे, राम मंदिराचे गुरुजी र श्री गुप्ते, श्री पालकर तसेच बरीच कार्यकारी मंडळी उपस्थित होती, पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट तर्फे अध्यक्ष श्री नंदकुमार वाढवकर, श्री निलेश गुप्ते, श्री पंकज गडकरी, श्री अजित व सौ. मोहना टिपणीस, श्री निलेश न गुप्ते व श्री सचिन राजे हि मंडळी उपस्थित होती ,

ज्ञातीचे श्री प्रभू राम मंदिर,त्याचे गेली १५० वर्ष पासून असलेले ऐतिहासिक महत्त्व, पुरात झालेले मंदिराचे नुकसान, त्याचा जीर्णोद्धार कशा प्रकारे करण्याचा संकल्प याची सविस्तर माहिती मांडलेले अध्यक्ष श्री टिपणीस काका, श्री रघुवीर देशमुख व महाड च. का. प्रभू मंडळींन कडून लवकरच आपणा सर्वांस कळेल

समाज हिताय सर्वजण सुखाय या ट्रस्टच्या ब्रीद वाक्याला स्मरून ज्ञातीतील आपल्या सर्वांच्या सहकार्याने यांच्या आज पर्यंत पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट तर्फे अंदाजे १,५०,०००/- रुपयांची अल्प मदत महाड आणि परिसरात आलेल्या या महाकाय पूरग्रस्त भागात करण्यात आली असून आज जवळ जवळ 2 महिने उलटून गेल्या नंतर हि मदत कमी आहे असे काल घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीच्या आढाव्या नंतर आणि याची कल्पना महाड असलेल्या घरावर उमटलेल्या पाण्याच्या रेघांनी वरून लक्षात येत आहे.,

धन्यवाद !
पुणे सीकेपी पब्लिक ट्रस्ट
निलेश गुप्ते
(सचिव)
८६६९१५१५३३